राजकारण

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण नाही

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण मिळालेलं नाही.

Published by : Siddhi Naringrekar

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण मिळालेलं नाही. असे वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आले. यावर वंचित बहुजन आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात सांगण्याच आले की, वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बैठकीला "बिन बुलाए मेहमान" बनून आम्ही जाणार नाही. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला आहे तो खोटा आहे. आम्हाला जोपर्यंत तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तो पर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करु नये.

वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये करावा अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. त्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहिले आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून त्यावर कुठलेच उत्तर किंवा प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत थेट बोलणी करणे का टाळत आहे. याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. महाविकास आघाडी आणि INDIA च्या संदर्भात बोलणी करण्याचे Power of attorney सर्वाधिकार काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिले आहेत का?  हे ही त्यांनी जाहीर करावे.

जर नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सत्तेतून खाली खेचायचे असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र प्रत्येक वेळी काँग्रेस नेते नवनवीन कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. एकत्र येण्यात काँग्रेसला काय अडचण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत राहणार आहोत.  असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील तरतुदी, न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा