Navneet Rana | Prakash Ambedkar Team Lokshahi Marathi
राजकारण

अमरावतीत जाऊन प्रकाश आंबेडकरांचा खासदार नवनीत राणांबाबत खळबळजनक दावा

अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत असताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणांबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Published by : Sagar Pradhan

मागील काही दिवसांपासून वंचितच्या मविआमधील समावेशावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे वंचितकडून देखील जागावाटपाबाबत वेगवेगळे विधान करण्यात येत आहे. त्यातच आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी अमरावती खासदार नवनीत राणा यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. यासोबतच ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाबाबत देखील मोठी माहिती दिली आहे.

नवनीत राणांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये घुमजाव सुरू आहे. कधी म्हणतात की भाजप आणणारा पाठिंबा देईल कधी म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल. असे बोलत त्यांनी नवनीत राणा येत्या 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील. असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाबाबत बोलत असताना आंबेडकरांनी पुन्हा एकदा मोठं विधान केले आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटासोबत आमचं 24-24 झालं आहे. ठाकरे गटासोबत आमची युती आहे. आमचं लोकसभासाठी 24-24 चा फॉर्म्युला ठरला. असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Kenekar : खुलताबादचं नाव 'रत्नापूर' करण्याची मागणी ; भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pravin Gaikwad : चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर असल्याचा आरोप

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया