Shriakant Bhartiya Team Lokshahi
राजकारण

भाजपचे आजचे दोन चर्चित चेहरे : OSD ते MLC प्रवास करणारे कोण आहेत श्रीकांत भारतीय

पंकजा मुंडे यांचे तिकीट कापले अन् दोन नवीन चेहरे चर्चेत आले.

Published by : Team Lokshahi

भारतीय जनता पक्षाने पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांचा नाव कापले गेले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल अशी चर्चा होती.परंतु दोन नवीन नावे आले आहेत. त्यात श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे चर्चेत नसलेली नावे आहेत. जाणून घ्या या दोघांबद्दल...

फडणवीसांचे ओएसडी ते उमेदवार

सेनेला अंगावर घेणारे, देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले, ते मुख्यमंत्री असतांना त्यांचे OSD आणि आता थेट MLC असा श्रीकांत भारतीय यांचा प्रवास थक्क करणारा आहे. श्रीकांत भारतीय भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी ते होते. भाजपचच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेला सतत आंगावर घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे भाजपच्या आक्रमक नेत्या आहेत. भाजप महिला मोर्चाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. त्या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद गेल्या आठवड्यात चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?