राजकारण

Nana Patole : भाजपवर आम्ही लक्ष ठेवून आहोत

Vidhan Parishad Election : नाना पटोले यांनी केली भाजपवर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) अवघे दोनच दिवस राहिले आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) खास काळजी घेण्यात येत असून प्रमुख पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रणनीती तयार झाली आहे. महाविकास आघाडी 6 जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, रणनीती तयार झाली आहे. आमचे अपक्ष आणि सहकारी सदस्य एकत्र आले आहेत. 20 तारखेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 6 जागा जिंकेल.

तर भाजपवर टीका करताना ते म्हणाले, आता विरोधकांचे अंतर जास्त आहे. त्यांना गणित कठीण जाईल. यामुळे भाजपची विकेट पडेल. महाविकास आघाडी जवळ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे आम्हाला भीती नाही. तर, भाजप कुणासोबत बोलतात, काय करतात यावर देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही पटोले यांनी सांगितले आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना फोन करत आहेत योग्य वेळी आम्ही हे दाखवू. तसेच, त्यांच्या दबावाला आम्ही घाबरत नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा