sadabhau khot Team Lokshahi
राजकारण

Vidhan Parishad Election : सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार

विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) भाजपने (BJP) आपली पाच नावे जाहीर केली होती. परंतु, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेसाठीही भाजपने अतिरीक्त सहावा उमेदवार जाहीर केला आहे. सहाव्या उमेदवारीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासहीत अनेकांची नावे चर्चेत होती. परंतु, सर्वांना मागे टाकत रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उमेदवारी मिळाली आहे.

राज्यसभेसाठी शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही अतिरीक्त उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. यानंतर लगेचच विधानपरिषद निवडणुकीचीही राजकीय धामधूम सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारती, उमा खापरे, प्रशांत लाड अशा पाच जणांना उमेदवारी दिली असून सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सहाही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगणार यात शंका नाही. तर गुप्त मतदानाच्या आधारावर सहाही उमेदवार निवडून आणण्याचा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तर, विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आजचा दिवस शिल्लक आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात