राजकारण

विधानसभा निवडणूक: काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अपक्षांना फोन, उद्धव ठाकरे संतप्त

राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आपआपल्या उमेदवारास जास्त मते कसे मिळतील, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आपआपल्या उमेदवारास जास्त मते कसे मिळतील, यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोन गेले आहे. ही बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांपर्यंत गेल्यानंतर ते चांगलेच संतप्त झाले.

शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केल्याने मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेकडे असलेल्या 55 मते आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदारांच्या बळावर विजयी होतील. मात्र क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून सावधगिरी घेतली जात आहे आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना फोन करुन पाठिंबा मागितला जात आहे. तसेच काँग्रेसचे दुसरे उमेदवार निवडून येण्यसाठी आठ मतांची गरज आहे. यामुळे काँग्रेसकडून आपले उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

राज्यसभेत भाजपने मिळवलेल्या विजयामुळे पक्षातील नेत्यांचे मनोबल वाढले आहे. आपले पाचही उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपकडून केला जात असतांना राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे निवडून येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे..

मलिक देशमुखांना परवानगी नाहीच, मतांचा कोटा 26 वर

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात तुरुंगात असलेल्या नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मतांचा कोटा आता 27 वरुन 26 वर करण्यात आला आहे. विधान परिषदेचं मतदान हे येत्या 20 जुनला होणार असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात