Vijay Wadettiwar Team Lokshahi
राजकारण

Vijay Wadettiwar : मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, राणांना म्हणाले...

राणा दाम्पत्यावर बोलताना कॉंग्रेस नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली

Published by : shamal ghanekar

सध्या महाराष्ट्र मध्ये भोंगे प्रकरण आणि हनुमान चालीसा (hanuman chalisa)प्रकरणावरून वादंग निर्माण झालेला आहे. यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये (shiv sena vs rana)मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी झाली. मात्र यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. तसेच राणा दाम्पत्यावर बोलताना कॉंग्रेस नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली आहे.

यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) म्हणाले की, राणा दाम्पत्यांनी विनाकारण आतंक माजवला आहे. त्यांनी मुंबई आणि दिल्लीला वेठीस धरले आहे. हे सर्व करण्यामागे यांचा काय हेतू आहे समजत नाही. यांनी मुंबईला (mumbai) अशांत केले आहे. त्याच मंत्री विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राना दाम्पत्यांना हारामखोर नीच हलकट अशा शिव्या देखील स्टेजवरून मंत्री विजय वडेट्टीवार दिल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे शिबिर आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भोंगे प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टारगेट केले. घरोघरी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचली जाते, हिंदू धर्मात लग्नाआधी हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं आणि आम्हाला सांगत आहेत की, हनुमान चालिसा वाचावी, ज्याने त्याने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. .राज ठाकरे यांनी झेंडे बदलले असाही आरोप त्यांच्यावर केला आहे. तर भोग्याच् समर्थन देखील केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी