राजकारण

Vijay Wadettiwar : मी पुन्हा येऊ शकत नाही ही भूमिका पटल्याने ट्विट डिलीट

भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सूचक ट्विट करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भाजप महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सूचक ट्विट करण्यात आले आहे. यात देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला असून नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असे कॅप्शनमध्ये लिहीले आहे. या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी पुन्हा येणार असं ट्विट केलं होतं तर कदाचित ते डिलीट करताना मी पुन्हा येऊ शकत नाही ही भूमिका पटल्याने त्यांनी डिलीट केलं असेल.

ज्यावेळी ते म्हणतात मी येईल त्यावेळी ते येत नाही. दोघेजण बाशिंग बांधून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. राज्यात सत्तांतर होईल. हे जे सरकार सुरू आहे केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर सुरू आहे. काहीतरी शिजत आहे, पुढची तयारी करत असताना हा सहज निघालेला ट्विट असे मी मानतो. असे वडेट्टीवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक