राजकारण

हे अपघात सरकारच्या घाईमुळेच; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरुन विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. यावर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

समृद्धीचा काम अर्धवट असतांना एंड टू एंड सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही. समृद्धीत भ्रष्टाचाराचं झाला हे कोणी नाकारू शकत नाही. घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहे. यात तांत्रिक अडचणी आहे. समृद्धीची वाहतूक थांबवावी का समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे, असे विजय वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.

तर, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर ते म्हणाले की, मागणी केली की असं आरक्षण जाहीर करता येत नाही, सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली, सरकार खेळवत ठेवण्याचे काम करत आहे. उद्या नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनेची रविभवन नेते अकरा वाजता बैठक होणार आहे. यात 40 संघटना असणार आहे. 10 दिवसात आरक्षण देता येते का? पुन्हा तोंडाला पान पुसली जाते का? ही जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये, असा पुनरुच्चार वडेट्टीवारांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा