कल्पना नळसकर - असूर, नागपूर
अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित दादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवार यांना घेऊन यावं लागेल अशी अटच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली आहे. तरच ते मुख्यमंत्री होऊ शकतील. त्यामुळे अजित दादांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ते दया, याचना करत असतील. आणि अजित दादांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. दोन पक्ष फुटल्यानंतरसुद्धा भाजपाची परिस्थिती सुधरत नाही. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, पृथ्वीराज बाबा हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, त्याचा अनुभव आणि माहिती मोठी आहे. त्या आधारावर ते म्हणाले असते गुप्त बैठकीमध्ये आपण कोणीच नसतो. त्यावेळेस नेमकं काय झालं याची माहिती बाबांकडे असेल त्यामुळे ते वक्तव्य केलं असेल. दोन पक्ष पडूनही भाजपची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. मासलीडर असलेले शरद पवार यांची गरज भाजपला आहे.त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.