MLA Rohit Pawar Team Lokshahi
राजकारण

पाहा फोटो: आमदार रोहीत पवारांनी असं काय केलं की त्यांचा फोटो होतोय व्हायरल...

रोहीत पवारांनी हुशारीने दिलेली उत्तरे, कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळणं, मतदार संघातील हॉटेलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह नाष्टा करणं, स्वत:ची चारचाकी गाडी सोडून कार्यकर्त्याच्या बुलेटवरून प्रचारासाठी जाणं अश्या अनेक गोष्टींमुळे आमदार रोहीत पवार हे चर्चेत असतात.

Published by : Vikrant Shinde

आमदार रोहीत पवार (MLA Rohit Pawar) हे सतत चर्चेत असतात. त्यांनी हुशारीने दिलेली उत्तरे, कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळणं, मतदार संघातील हॉटेलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह नाष्टा करणं, स्वत:ची चारचाकी गाडी सोडून कार्यकर्त्याच्या बुलेटवरून प्रचारासाठी जाणं अश्या अनेक गोष्टींमुळे आमदार रोहीत पवार हे चर्चेत तर असतातच त्याशिवाय, राज्यभरातील जनतेचे प्रेम मिळवत असतात. त्यांच्या ह्याच गुणांमूळे त्यांनी अगदी कमी कालावधीत मोठा चाहता वर्गही कमावला आहे.

दरम्यान, 05-04-2022 रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) ह्यांनी दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वपक्षीय नवनिर्वाचित आमदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. ह्यावेळी नितीन गडकरीदेखील (Nitin Gadkari) उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

Rohit Pawar carrying Chair

नेमकं प्रकरण काय?

परंतु, स्नेहभोजनावेळी गडकरींच्या उपस्थिती सोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली. ती गोष्ट म्हणजे, आमदार रोहीत पवारांचा एक फोटो. ह्या फोटोमध्ये आमदार रोहीत पवार स्वत: खुर्ची उचलून आलेल्या आमदार पाहूण्यांची सोय कशी करता येईल पाहत होते. त्यामुळे 'अगदी कार्यकर्त्यासारखा काम करणारा आमदार' अश्या कॅप्शनसह हा फोटो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते (NCP Workers) शेअर करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय