राजकारण

Vishwajeet Kadam Meet Sharad Pawar: काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Published by : Dhanshree Shintre

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली. 4 ऑक्टोबर रोजी शरद पवार सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन, या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण देण्यासाठी आज विश्वजित कदम यांनी पवारांची भेट घेतली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भेटीगाठीतून अनेक राजकीय समीकरणे जुळवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते शरद पवार यांना येऊन भेट आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असलेले विश्वजीत कदम यांची भेटही अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

Pune Bhide Bridge : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

iPhone 17 : Apple ने नव्या फीचर्ससह लाँच केला आयफोन 17

Accident : अटल सेतूवर भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच मृत्यू