राजकारण

...तर त्यांनी गद्दाराची व्याख्या जाहीर करावी; शिंदे गटात गेलेल्या आमदारानं व्यक्त केली भावना

आम्हांला जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) यांनी केलं आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : महविकास आघडीतून (mva) बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार नाही, मी शिवसैनिकच आहे. शिवसेना (shivsena) संपवण्याचा राष्ट्रवादीचा (NCP) डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको हाेती म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलाे आहाेत. यामुळं आम्हांला जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) यांनी केलं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.

शिंदे गटातील कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्याच्या शहर प्रमुख पदाबाबत चर्चा होती. याबाबत बोलताना आमदार भोईर यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही ,मी अजूनही शिवसैनिक ,उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

तसेच नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचा नाव देण्याबाबतचा निर्णय आहे तो मंत्रिमंडळात होईल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता मात्र सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही ,मात्र दिबा पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरू ,हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेनार अस सांगितल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ