Kasba Chinchwad Bypoll election Team Lokshahi
राजकारण

कसबा अन् चिंचवड मतदारसंघात मतदारांनी फिरवली पाठ; दोन्ही ठिकाणी झाले 'इतके' मतदान

कसबा अन् चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे यावेळी मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. आता 2 मार्चला या दोन्ही ठिकाणचा निकाल जाहीर होईल.

Published by : Sagar Pradhan

एकीकडे राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे अनेक दिवसांपासून पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा होत होती. सर्वच पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आज या दोन्ही जागांसाठी मतदान पार पडले. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे यावेळी मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडले तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 मतदान पार पडले. आता 2 मार्चला या मतदानाचा निकाल जाहीर होईल.

कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदान संथगतीने सुरू असल्याचे दिसले. चिंचवडमध्ये दुपारी 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. तर शेवटी संध्याकाळी पाचपर्यंत कसबा विधानसभा मतदार संघात 45.25 टक्के मतदान झाले तर चिंचवड विधानसभा मतदार संघात 41.1 इतके मतदान झाले. या आकडेवारीवरून मतदारांमध्ये उदासीनता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत अभिनेत्री सायली संजीवने केली गणरायाची प्राण प्रतिष्ठापना

Latest Marathi News Update live : जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अटीशर्थीसह परवानगी

Ganesh Chaturthi 2025 : "माझी आई व बाबा पाच वर्षापासून...." लग्नाबाबत बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच मोठ वक्तव्य

Ganeshotsav 2025 : अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन