राजकारण

Sanjay Raut: श्रावणात बीफ कोणी खाल्लं? संजय राऊतांचा प्रश्न

श्रावण आहे, गणपती आहे, अमुख आहे, हिंदुत्व आहे. बीफ खायचा आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे.

Published by : Dhanshree Shintre

मणिपूर हा या हिंदुस्तानचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या अडीच वर्षापासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वतःला विश्वगुरू नॉन बायोलॉजिकल ईश्वराचे अवतार, ईश्वराचे दूत मानतात. जे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध मिटवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जातात. मोदी प्रत्यक्ष युद्धभूमीवर अंध भक्त सांगतात आणि मोदी युद्धभूमीवर आहेत म्हणून चार तास रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही असे ढोल वाजवतात. मोदी पूतीन बरोबर चहा पितात घरात बसून मग झेलेन्सकीला भेटतात युद्ध बंदीवर चर्चा करतात. इस्त्रायल आणि गाजा पट्टीतील युद्धाविषयी ते चर्चा करतात. असे ते फार मोठे एक निधड्या छातीचे नेते आपल्या देशाला लाभलेले आहेत. या महा नेत्याला आमच्या देशातल्या मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही. ते अपयश त्याने स्वीकारले पाहिजे. प्रधानमंत्री अद्याप मणिपूरला गेले नाही. एअर इंडिया वन घेऊन ते जगभरात फिरत आहेत, संपूर्ण जगात फिरतायेत पण मणिपूर पेटला या देशाचा एक भाग रॉकेट हल्ले होतायेत, ड्रोनने हल्ले होतायेत, नेत्यांना मारलं जातंय, महिलांची इज्जत रस्त्यावर डीअब्रू केली जात आहे, विद्यार्थ्यांवर गोळीबार होत आहे, बॉम्ब हल्ले होतायेत.

गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत, राजकीय बैठका घेत आहेत, निवडणुकांची तयारी करत आहेत, आमच्यावर टीका करत आहेत, मोदीही बोलतायेत पण मणिपूर वर कधी बोलणार? मणिपूरवर कधी अ‍ॅक्शन घेणार? का तुम्हाला मणिपूर आपल्या हातातून घालवायचा आहे. आता पंडित नेहरू नाही आहेत दोष द्यायला आता तुम्ही साधारण 11 वर्ष आपण सत्तेवर आहात आणि मणिपूर ज्या पद्धतीने पेटलं आहे ती मणिपूरची अवस्था ज्या काळात कश्मीर पेटलं होतं त्याच्यापेक्षा भयंकर आहे. मोदी आणि अमित शाह या संदर्भात एक अक्षर बोलायला तयार नाही याचा अर्थ या देशातल्या जनतेने काय घ्यायचं? मोदींनी मणिपूरला जावं युक्रेनला जाण्यापेक्षा आणि जगाला एका हिरोसारखा अ‍ॅक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन आपल्या देशाच्या काळजाचा तुकडा आहे तो तिथए जा जरा नाहीतर राजीनामा द्या असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

हा रस्ता सुरक्षेतेचा नियम नसून हा बेवडे बाजीचा नियम आहे. या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात सामान्य माणसाकडून झाला असता तर पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, मित्राला पकडून पोलिसांनी रस्त्यावर धींड काढली असती. पण सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो पण तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही मी, तो कोणाचाही मुलगा असेल कायदा सगळ्यांसाठीच समान हवा आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था ह्याचे धिंधवडे काढले आहेत त्याची नोंद काळ्याकुठ अक्षरात लिहिल जाईल. इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. नागपूरात त्यांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला 17-18 लोकं होस्पिटलमध्ये आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे त्याचं नाव एफआयआरमध्ये घेत नाही. लाहोरी बारमधील जे बिल मिळाले आहे त्याच्यावरती खाण्याचे पिण्याचे जे बिल आहे ते बिल लोकांसमोर आणले पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचे बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात. चिकन, मटन आणि त्याबरोबर बीफ कटलेट ह्याचे देखील बिल त्याच्यात आहे, गोमांस जे आम्हाला हिंदुत्व शिकवतात.

श्रावण आहे, गणपती आहे, अमुख आहे, हिंदुत्व आहे. बीफ खायचा आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही अनिल देशमुख यांना अटक करायला निघाले होतात. चार वर्षेच्यापूर्वी एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय, पण तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या एका मुलाने 10 गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन अपघात केला त्याला तुम्ही अभय देत आहात, कुठे फेडाल हे पाप तुम्ही असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : किम-पुतीन भेटीनंतर ट्रम्प संतप्त; अमेरिकेविरोधात कट रचल्याचा आरोप

Chhagan Bhujbal On Maratha Reservation GR : "गरज पडली तर कोर्टात जाऊ", मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन छगन भुजबळांची सरकारविरोधात भूमिका

Vinod Patil On Maratha Reservation GR : "सरकारचा निर्णय मराठ्यांच्या हिताचा नाही" मराठ्यांच्या जीआर विनोद पाटलांची तीव्र टीका

Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज, महायुतीतील नेत्याने स्पष्ट केली महत्त्वाची माहिती