राजकारण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Published by : Dhanshree Shintre

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई ठाणे परिसरात लागलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसत असताना अजित पवार यांना मात्र बदल देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार महायुती मधील भाजप व शिवसेनेला ही नकोसे झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्यामागील चर्चेत असलेली कारणे-

महाविकास आघाडी मधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपला फायदा झाला नाहीच, याउलट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह महाविकास आघाडीच्या जागा मात्र वाढल्या.

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मधील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ, मंत्री धर्माराव बाबा आत्राम अशा बड्या नेत्यांची मुले मात्र शरद पवारांच्या गटात सामील होत आहेत. त्यामुळे बडे नेते नेते कोणासोबत आहेत? याबाबत स्पष्टता नाही.

धक्कादायक बाब म्हणजे दादांच्या नेतृत्वाखालील बरेचसे आमदार सातत्याने शरद पवारांच्या गटात सामील तरी होत आहेत किंवा गाठीभेटी तरी घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महायुतीमधील समावेशाबाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.

भाजपचे वरिष्ठ नेतृत्व असलेल्या अमित शहा यांच्या दौऱ्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अजित पवार यांची अनुपस्थिती अधिक चर्चेचा विषय ठरली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यापूर्वी अजितदादा नकोसे असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? या चर्चांना अधिक रंग चढला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा