Jaimangal Kanaujia | BJP  team lokshahi
राजकारण

'या' भाजप आमदाराची महिलांनी केली फजिती, पाहा व्हिडिओ

आमदार स्वत:हा म्हणाले हे गरजेचं कारण...

Published by : Shubham Tate

BJP MLA Jaimangal Kanaujia : उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे भाजप आमदार जयमंगल कन्नोजिया आणि नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांना मंगळवारी रात्री मातीने आंघोळ घालण्यात आली. हे 'इंद्र भगवान' यांना प्रसन्न करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आमदार जयमंगल कन्नोजिया म्हणाले की, जुलैच्या कडक उन्हात सर्वानाच त्रास सहन करावा लागत आहे, लोक पावसाची वाट पाहत आहेत, मात्र पाऊस नसल्याने रोपे सुकत आहेत. एखाद्याला चिखलाने आंघोळ घातली तर भगवान इंद्र प्रसन्न होऊन पाऊस पडेल अशी जुनी परंपरा आहे. (women bath bjp mla and municipality president with mud in maharajganj)

प्रकरण शहरातील पिपर देउरा परिसरातील आहे. पावसाअभावी अस्वस्थ झालेल्या येथील महिलांनी जिल्ह्याचे आमदार जयमंगल कन्नोजिया व नगराध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल यांना चिखलाने आंघोळ घातली. चिखलाने आंघोळ घालणार्‍या महिलांनी सांगितले की, चिखलाने स्नान केल्याने भगवान इंद्र प्रसन्न होतात असे मानले जाते. महाराजगंज जिल्हा हा कृषी आधारित क्षेत्र आहे. पावसाशिवाय भात उत्पादनात घट होऊ शकते.

चिखलाने आंघोळ करूनही आमदार व नगराध्यक्ष नाराज झाले नाहीत

आमदार जयमंगल कन्नोजिया आणि नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल जैस्वाल रात्री चिखलाने आंघोळ करूनही नाराज झाले नाहीत. हसत हसत चिखलाने अंघोळ केली. ही आमची जुनी परंपरा असल्याचे आमदार म्हणाले. त्यामुळे इंद्रदेव प्रसन्न होऊन पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. पिकांनाही फायदा होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी