Chandrakant Patil
Chandrakant Patil  
महाराष्ट्र

'हरवले आहेत', 'दादा परत या', पुण्यातील बॅनरची राजकीय वर्तुळात एकच चर्चा

Published by : left

पुण्यात सध्या एका बॅनरची खुप चर्चा रंगली आहे. हे बॅनर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या संदर्भातले हे बॅनर लावण्यात आले आहेत. 'दादा परत या', 'हरवले आहेत' अशा आशयाचे हे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

"पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर,"असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. तर 'दादा परत या' असा उल्लेख केलेल्या बॅनरवर लिहिलं आहे की, "दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरुडकर." अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत.

भाजपकडून कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झालेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सध्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यस्त आहे. ते सध्या कोथरुडमध्ये नाहीत, कोल्हापुरातच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कोथरुड परिसरात एखाद्या हरवलेल्या व्यक्तीच्या बॅनर किंवा पोस्टर जरा मजकूर लिहितात तसा मजकूर लिहित चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. पण हे बॅनर नेमके कोणी लावले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला