महाराष्ट्र

अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद; पीडित तरुणीशी जबरदस्तीने केले लग्न, सहा महिन्यांपासून मानसिक व शारीरीक छळ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहाचे रोज नवनवीन प्रकरण समोर येत आहे. सहा महिन्यांपुर्वी युवतीने आंतरधर्मीय विवाह केला होता. यानंतर मानसिक आणि शारीरीक छळ झाल्याची माहिती पीडित तरुणीने दिली. यानंतर तरुणीला कुटुंबियांनी परत आणले आहे. पीडित तरुणीने आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी मेळघाटातील धारणी येथील 23 वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने हैदराबाद येथे पळवून नेले व मौलानाच्या घरी नेऊन जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने विवाह केला. त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त केले. तसेच, गोमांस खाण्यासाठीही जबरदस्ती केली जात होती, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करत घरी आणले. आता सदर तरुणी सुखरूप आहे.

या युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती. मात्र, धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला, असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबावर कारवाई करून त्यांना अटक करावी व मुलीचा शोध न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी