महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis | आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय..., - दीपक केसरकर

जेव्हा एवढी लोकं एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधे काहीतरी असेल जे सर्व लोकांन खटकलं असेल, आम्हाला कोणी असं करा म्हणून सांगितलं नाही, आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना मुळात नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, असे केसरकर यावेळी म्हणाले.

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांची बैठक आज पार पडली. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्तेपदी माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची पुढील वाटचाल कशी असेल हे सांगितलं आहे. या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे गटाती गुवाहाटी येथे बैठक झाली त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज आहे आम्ही अजूनही शिवसेना (shivsena ) पक्षाचेच सदस्य आहोत, असे केसरकर यावेळी म्हणाले आहेत. जेव्हा एवढी लोकं एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधे काहीतरी असेल जे सर्व लोकांन खटकलं असेल, आम्हाला कोणी असं करा म्हणून सांगितलं नाही, आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना मुळात नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, असे केसरकर यावेळी म्हणाले.

तसेच गटनेता निवड, १६ आमदारांना नोटीस यासंदर्भात आम्ही कोर्टात जाऊ, असं दीपक केसरकर म्हणाले. त्याचबरोबर आमदारांचे काही अधिकार असतात, मागण्या असतात.आम्ही पक्षप्रमुखांना अनेक वेळा सुचवलं होतं की ज्या युतीत आपण लढलो, त्यांच्याच सोबत राहूया, कित्येक वेळा उद्धव साहेबांना आम्ही हे सांगितलं, ते ऐकतील असं वाटलं होतं. इतके वेळा इतके जण सांगतात, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असं उद्धव ठाकरे यांना समजायला हवं होतं. कोणीही आम्हाला असं करा सांगितलं नाही. उद्धव ठाकरेंनीच आम्हाला एकनाथ शिंदे हे नेते असल्याचं ठरवून दिलंय, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

दोन तृतियांश मताच्या मुद्द्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, घटनात्मक तरतुद अशी आहे की वेगळं मत मांडण्यासाठी हे आवश्यक असतं, ते दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य