महाराष्ट्र

Mahabaleshwar, Pachgani tourist | महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी शनिवारपासून खुले; रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्‍वर,पाचगणी ही पर्यटनस्थळे उद्या शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर चेक नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी दिली.

महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर बैठक पार पडली. या बैठ्कीत तहसिलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर उपस्थित होते. यामध्ये सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन नियमात शिथिलता देत काही निर्बंध उठविले. त्यामुळे शनिवार 19 जून पासून महाबळेश्वर आणि पांचगणी ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणीचे अहवाल बरोबर घेऊन येणाऱ्या पर्यटकांची पांचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह असतील अशाच पर्यटकांना महाबळेश्वर,पांचगणी येथे प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान बाजार पेठेतील दुकानदारांची कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. व्यापारी व हॉटेलमधील कामगार यांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक व व्यापारी यांना बंधनकारक करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा