महाराष्ट्र

Mahad Flood | आदिवासी वस्तीतील संसार रस्त्यावर

Published by : Lokshahi News

मागील आठवड्यात आलेल्या महापूराने हजारो संसार उध्वस्त केले. महाड तालुक्‍यात तर हाहाकार उडाला. याच तालुक्‍यातील काळीजकोंड आदिवासी वस्तीतील बावीस घरे अक्षरशः जमीनदोस्त झाली. आज ही मोडलेली घरे आणि वाहून गेलेला संसार पाहत बसण्यापलीकडे काहीच उरलेले नाही.

अन्नधान्य आणि कपड्यांची तात्पुरती मदत पोहचते. पण शिजवायचे कशावर आणि झोपायचे कुठे या समस्या आहेतच. नदी काठावर वसलेली ही वस्ती कधी ना कधी पुराचा फटका बसणारच होता म्हणूनच गेली तीन वर्षांपासून ही माणसे प्रशासनाकडे सुरक्षित जागेची मागणी करत होते.

मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आज अखेर ही बावीस घरं जमीनदोस्त झाली. आता तरी डोळे उघडा आणि आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी हे लोक करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?