महाराष्ट्र

Mahad Taliye Landslide | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळियेत दाखल; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

Published by : Lokshahi News

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहाणी झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यातील इतरही महत्वाच्या नेत्यांनी पुरग्रस्त व दरडग्रस्त भागांची पाहणी केली आहे. त्यानंतर आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दरड कोसळुन उध्वस्त झालेल्या तळिये गावात दाखल झाले आहेत.

नागरिकांना जोरदार पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तसेच अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडुन नागरिक मदतीची अपेक्षा करत आहेत. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर भाजप नेते आशिष शेलार तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील उपस्थित आहेत. तळिये गावातील दुर्घटनेत मृत झालेल्यांना राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली आहे.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना