12th result  team lokshahi
महाराष्ट्र

HSC Result : कोकण विभागाची बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल

अमरावतीचा निकाल 96 टक्केपेक्षा जास्त

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुंबई विभाग सर्वात मागे राहिला तर कोकण विभागाने बाजी मारली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) 08 जूनला जाहीर होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार आहे.

राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे.

पाह विभागानुसार निकाल

पुणे- 93.61%

नागपूर- 96.52%

औरंगाबाद- 94.97%

मुंबई- 90.91%

कोल्हापूर - 95.07%

अमरावती - 96.34 %

नाशिक - 95.03%

लातूर- 95.25%

कोकण - 97.21%

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी आघाडी घेतली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली तर 93.29 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती