महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त

Published by : Lokshahi News

राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. आज २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे.

आज १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर आज ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?