Corona Virus 
महाराष्ट्र

दिलासा! राज्यात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला नाही

Published by : Lokshahi News

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली असताना आजचा दिवस काहीसा दिलासादायक आहे. राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. राज्यात आज तब्बल 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.

राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेच्या मोर्चाआधी पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Maharashtra School : राज्यातील 5 हजार शाळा 2 दिवस राहणार बंद, कारण काय?

Avinash Jadhav : मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Onion Purchase From Farmers : 'केंद्र शासनाने थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा'; राज्याचे पणन मंत्री आणि कृषिमंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी