महाराष्ट्र

Maharashtra Corona Update : राज्यात 9 हजार 666 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर 66 रूग्णांचा मृत्यू

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे.मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.60 टक्के आहे.

सध्या राज्यात 7 लाख 24 हजार 722 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2394 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.तर सलग तीन दिवसांपासून राज्यात ओमायक्रॅानचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2023 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस