(Corona virus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.
यातच राज्यात कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या 30 रुग्णांमध्ये मुंबई - 8, ठाणे महापालिका - 3, नवी मुंबई 2, कल्याण महापालिका - 2, पुणे महापालिका - 8, कोल्हापूर महापालिका 1, सांगली 1 आणि नागपूर महापालिका - 5 रुग्णांचा समावेश आहे
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.