(Hindi Language) हिंदी सक्तीच्या विरोधानंतर राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पायाभूत मूल्य शिक्षणाचे विशेष समाविष्ट करण्यात आले आहेत.
तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा शिकण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहे.राज्य सरकारने तिसरी ते दहावी साठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे.या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा म्हणून हिंदीला वगळण्यात आलं आहे.
www.maa.ac.in यावर हा अभ्यासक्रम पाहता येणार असून 28 जुलैपासून यावर नागरिकांना अभिप्राय देता येणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.