महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने नव निर्मात्यांना नव्या संधी उपलब्ध होणार'

मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील वाढीव संधींबाबत भूमिका मांडली.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर (Mumbai Jio World Centre ) येथे आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्राच्या गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील वाढीव संधींबाबत भूमिका मांडली. भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने आयोजित या परिषदेत विविध उद्योगातील प्रमुख व्यक्तींशी गोलमेज चर्चा झाली.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे सर्जनशील आणि तंत्रज्ञानसमृद्ध राज्य असून येथे व्हिडिओ गेमिंगसह नवनवीन डिजिटल माध्यमांना उत्तम पोषक वातावरण उपलब्ध आहे. अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत असून, त्यामुळे स्थानिक क्रिएटर्सना जागतिक व्यासपीठ मिळण्याचा मार्ग खुला होईल.

भारतीय पारंपरिक खेळांचे डिजिटल रूपांतरण करून त्यांचे बौद्धिक संपदा हक्क (IP) तयार करणे आणि जागतिक बाजारपेठेत त्याचे व्यावसायीकरण करणे हे महाराष्ट्रासाठी मोठे आर्थिक संधीचे दार उघडेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारसोबत सकारात्मक संवाद साधून करसवलती व इतर योजनांची अंमलबजावणी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी ओटीटी आणि डिजिटल कंटेंटच्या वाढीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, मराठी भाषेत अधिक दर्जेदार कंटेंट निर्मितीसाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कंटेंट क्रिएटर्ससाठी अपस्किलिंगसाठी टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सहकार्य केले जात आहे.

मनोरंजन क्षेत्रासाठी ‘एक खिडकी प्रणाली’ महाराष्ट्रात लागू करण्यात आली असून, सर्व परवाने एका पोर्टलवरून मिळू शकतात. शासकीय ठिकाणी शूटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही योजना निर्मात्यांसाठी मोठी दिलासा आहे. या परिषदेमध्ये विविध क्रिएटर कंपन्यांचे सीईओ, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते. त्यांनी मराठी कंटेंट निर्मिती, परवाने आणि कलाकारांशी संबंधित अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीतून महाराष्ट्राने डिजिटल क्रिएटिव्ह उद्योगासाठी भक्कम पावले टाकण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याचे लक्ष्य आता केवळ देशातील नव्हे, तर जागतिक क्रिएटिव्ह केंद्र होण्याचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Mumbai cha Raja 2025 : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन