सध्या राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. शाळांमध्येदेखील विद्यार्थीनींबरोबर अनेकदा अनैतिक प्रकार घडल्याच्या घटना कानावर आल्या आहेत. आशातचा आता महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. आगामी शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या बसमध्ये आता सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
आगामी शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी :
राज्यामध्ये सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शाळा आहेत. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कूल बस आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला आता आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून 10 हजारांहून अधिक दंड होऊ शकतो. स्कूल बसमधील सीसीटीव्हीचे फुटेज किमान 30 दिवस साठवून ठेवण्याचे बंधन शाळांना असेल.
महामंडळाकडील 15 हजार बसगाड्यांपैकी तीन हजार बस पुढच्या वर्षापर्यंत स्क्रॅपमध्ये निघणार आहेत. त्यामुळे सुस्थितीतील 12 हजार बसगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगामी दोन महिन्यांत प्रत्येकी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून त्याचा मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे. मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन असून तया सर्व बसगाड्यांना 'जीपीएस' प्रणाली देखील असणार आहे. त्यामुळे बसगाड्यांचे नेमके लोकेशन समजायला मदत होईल.
नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस :
त्याचप्रमाणे स्वारगेट दुर्घटनेनंतर आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य परिवहनकडील सध्याच्या 12 हजार बसगाड्यांसह नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये GPS,पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे