(Maharashtra Heavy Rain Alert ) राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस राज्याच्या उर्वरित भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 6-7 दिवस महाराष्ट्रासह 4 राज्यात अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून यासोबतच महाराष्ट्राच्याही काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.