(IAS Transfer) राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने नुकतेच सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. डॉ. अशोक करंजकर यांची महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर सुशील खोडवेकर यांची नेमणूक तुकाराम मुंढे यांच्या जागी असंघटित कामगार विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे.
मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आता डॉ. संजय कोलते कार्यरत होतील. या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनिक रचनेत काही महत्त्वाचे बदल घडले आहेत.
बदली झालेले अधिकारी आणि नवी जबाबदारी
1. डॉ. अशोक करंजकर
महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती.
2. डॉ. संजय कोलते
मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक.
3. सुशील खोडवेकर
मुंबईतील असंघटित कामगार विकास आयुक्त.
4. सावन कुमार
भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी.
5. नमन गोयल
नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
6. डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्त
नाशिकच्या इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी.
7. लघिमा तिवारी
चंद्रपूरच्या गोंडपिपरी उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी.