महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो सावधान ! बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांची विक्री

अमरावतीच्या वरुड, यवतमाळच्या बाभुळगाव आणि वर्ध्याच्या पुलगाव परिसरात ही बोगस बियाण्यांची विक्री सर्रास सुरू आहे.

Published by : Shamal Sawant

खरीप हंगामाची चाहूल लागली, शेतकरी मशागत व तयारीत मग्न झाले आहेत आणि त्याच दरम्यान, बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांची विक्री पुन्हा जोमात सुरू झाली आहे! शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील बियाणे दलालांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले जाळे पसरवले आहे.

राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांत वाढते संकट

अमरावतीच्या वरुड, यवतमाळच्या बाभुळगाव आणि वर्ध्याच्या पुलगाव परिसरात ही बोगस बियाण्यांची विक्री सर्रास सुरू आहे. कृषी विभागाच्या कारवाईत हे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आले असून, यावर्षी ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

कृषी आक्रमक भूमिका

या अवैध व्यवहाराला रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, 15 विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक थेट शिवारात जाऊन कारवाई करत आहे. बीजी-3 (HTBT) वाणाचा वापर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे! शिक्षा? तब्बल 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

दलालांचा फसवणुकीचा 'खेळ'

'राउंडअप बीटी', 'चोर बोटी', 'बीडगार्ड', 'HTBT' अशी गोंडस नावे लावून दलाल बोगस बियाणे विकतात. बहुतेकदा ही बियाणे विनापावती दिली जातात आणि थेट घरपोच पोचवली जातात. त्यामुळे शेतकरी गोंधळून फसतात.

कृषी विभागाचे नियम :

फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करा.

बियाण्याचे पाकीट सीलबंद आणि मोहोरबंद आहे याची खात्री करा.

उगमशक्ती आणि अंतिम मुदत तपासली का? विसरू नका!

संतुलित वाणांची निवड करा , एकाच वाणावर विसंबू नका.

100 मिमी पावसाआधी कापूस लागवड करू नका. पूर्वहंगामी पेरणी टाळा.

फसवणूक झाली? आवाज उठवा!

काहीही संशयास्पद वाटल्यास, बेकायदेशीर विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधा. आपल्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होईल आणि इतर शेतकरीही फसवणुकीपासून वाचतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ