अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत पंचानी दिलेल्या निकालाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी कुस्ती क्षेत्राशी संबंधित 5 जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर या निर्णयावर शिवराज राक्षेनं आक्षेप घेतला आणि राग अनावर झाल्याने थेट पंचाची कॉलर पकडून लाथ मारली.
या लढतीवर अनेकांना प्रतिक्रिया दिल्या अनेक प्रश्न उपस्थित केले. पुन्हा कुस्ती घेण्याची मागणी देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत मोठा निर्णय घेत अंतिम लढतीत पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली.
28 फेब्रुवारीपर्यंत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या अंतिम लढतीसंदर्भात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.