महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार पैसे, मंत्र्यांनीच केली घोषणा

मात्र अक्षय्य तृतीया होऊन 2 दिवस उलटले तरीही पैसे अद्याप खात्यात जमा झाले नाहीत.

Published by : Shamal Sawant

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची साध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असते. एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप बहीणींच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहीणींना हप्त्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार होता. मात्र अक्षय्य तृतीया होऊन 2 दिवस उलटले तरीही पैसे अद्याप खात्यात जमा झाले नाहीत.

मात्र आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या दोन-तीन दिवसांत जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे".

एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर होत असल्याच्या चर्चादेखील रंगल्या. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता हफ्ता थकण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान लाभार्थी महिलांना आतापर्यंत 13500 रुपये मिळाले आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा