महाराष्ट्र

Monsoon Update : पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईला ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department IMD) सांगितलंय की, येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा उत्तर-पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत खालच्या पातळीवर कायम आहे, त्यामुळं जोरदार वारे वाहू लागले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

भारतीय हवामान खात्यानं (Indian Meteorological Department IMD) सांगितलंय की, येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण भारतात पावसाची शक्यता आहे. कमी दाबाची रेषा उत्तर-पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत खालच्या पातळीवर कायम आहे, त्यामुळं जोरदार वारे वाहू लागले आहे.

पुढील पाच दिवस मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित आहे.

काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे. तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. यामुळे पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे.

दरम्यान, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तराखंडमध्ये 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. शिवाय बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या भागात पुढील 4-5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा