(Maharashtra Monsoon ) राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुढील 3-4 दिवसांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3-4 दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.