MAHARASHTRA POLITICS: NCP SHIV SENA AIMIM ALLIANCE FORMED IN PARLI, BEED 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बीडच्या परळीत राष्ट्रवादी शिवसेना MIM एकत्र, भाजपने केला स्वतंत्र गट

NCP Shiv Sena Alliance: बीडच्या परळी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिंदे शिवसेना आणि एमआयएम यांची अनपेक्षित युती झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Published by : Dhanshree Shintre

बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगरपरिषद गटनेत्यांच्या निवडीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतच एमआयएमच्या नगरसेविकेचा समावेश करून नवीन युतीची घोषणा केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. या युतीमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या एमआयएम नगरसेविकेला मित्रपक्ष म्हणून सामावून घेण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या गटनेत्यांच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची गटनेतेपदी बिनविरोध निवड झाली. या गटात एकूण २४ नगरसेवकांचा समावेश आहे, ज्यात अजित पवार गटाचे १६, शिंदे गट शिवसेनेचे २, एमआयएमचे १ आणि अपक्ष ४ नगरसेवकांचा सहभाग आहे. यामध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा विशेष उल्लेख आहे. नगराध्यक्षपदासाठीही या गटाकडून दावा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारकाळात शेख आयशा मोहसीन यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी घेतलेल्या सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र शेरेबाजी करण्यात आली होती. या आक्षेपार्ह भाषणामुळे त्या प्रभागात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते. आता मात्र हेच एमआयएम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झाल्याने राजकीय विश्लेषकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या युतीमुळे परळीतील सत्तासमिकरण कसे ठरेल याबाबत उत्सुकता आहे.

या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेने एमआयएमला मित्रपक्ष म्हणून स्वीकारल्याने मुंडे भावंडांवरील आरोपांना नवे वळण मिळाले आहे. परळी नगरपरिषदीतील येणाऱ्या बैठकीत या युतीची खरी ताकद कशी दिसेल हे पाहणे रोचक ठरेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा