महाराष्ट्र

Monsoon Update | महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा इशारा

पुढील पाच दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज गडचिरोली आणि उद्या चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मुंबईसह कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतो. याचदरम्यान हवामान विभागाने आज पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाची इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून ते पुढील तीन दिवस मुसळधार पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज गडचिरोली आणि उद्या चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईत काही वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, पालघरमध्येही आज पावसाची दमदार बॅडिंग सुरु आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसाच्या हजेरीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान शेतीच्या कामांना देखील सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात सातारा, आणि कोल्हापूर भागातही पाऊस सुरु असून या सर्व ठिकाणी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईतील दादर, माहिम, माटुंगा, वरळी आणि उपनगरीय भागातही धो-धो पाऊस सुरु आहे. याशिवाय ठाणे, कल्याण आणि अंबरनाथमध्येही धुवांधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम दिसून येत आहे. लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे. तर बेलापूर, खारघर, पनवेल परिसरातही मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. वाढत्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा