(Maharashtra Rain ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई आणि मुंबई उपनगरात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.