( Maharashtra Rain Update )राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली असून आता राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात 31मेपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21ते 31मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.