ssc result Team Lokshahi
महाराष्ट्र

SSC Result : दहावीचा निकाल 96.94 टक्के, पुन्हा मुलीच अव्वल, लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहा निकाल

Maharashtra SSC Result 2022 : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल दुपारी 1 वाजता लोकशाहीच्या www.lokshahi.com वेबसाईटवर पाहता येणार आहे.

दुपारी 1 वाजता असा पाहा निकाल :

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

http://mahresult.nic.in

कसा पाहाल निकाल?

स्टेप 1 : लिंकवर लॉन ऑन करा

स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपले सीट नंबर टाका

स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल

स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

यंदाही निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतून १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीसह ६,५०,७७९विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. २४विषयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२,२१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

नाशिकचा निकाल सर्वात कमी

कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला असून नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 66 पैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

पुणे: 96.96%

नागपूर: 97%

औरंगाबाद: 96.33%

मुंबई: 96.94%

कोल्हापूर: 98.50%

अमरावती: 96.81 %

नाशिक: 95.90%

लातूर: 97.27%

कोकण: 99.27%

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज