Maharashtra Weather Update 
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार; राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Weather Update ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?