थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session) आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार असून यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती मिळत आहे. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
Summery
नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत होणार
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार