महाराष्ट्र

Maharashtra vaccination । लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

Published by : Lokshahi News

कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राने दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला आहे.

लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार

Ganeshotsav : Amravati : अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रूटपासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती

Narayan Rane : भाजप नेते खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

GST : जीएसटीत मोठा बदल, आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर