थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vanchit Bahujan Aaghadi) वंचित बहुजन आघाडीची आज संविधान सम्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे. या संविधान महासभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संबोधित करणार असून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ही सभा होणार आहे.
संविधानाचे महत्व जनतेला पुन्हा एकदा समजावून सांगण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आजच्या सभेतून प्रकाश आंबेडकर सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य करणार असल्याची माहिती मिळत असून या सभेतून प्रकाश आंबेडकर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
आजच्या या संविधान सम्मान महासभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला रेखा ठाकूर, सुजात आंबेडकर आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
Summery
वंचित बहुजन आघाडीची आज संविधान सम्मान महासभा
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार सभा
प्रकाश आंबेडकर महासभेला संबोधित करणार