Narayan rane  
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार जुनमध्ये कोसळणार; नारायण राणेंची भविष्यवाणी

मुख्यमंत्री हे फांदीवर असून,खोडावर नाहीत.

Published by : left

गोपाल व्यास, वाशिम | कोकण किणारपट्टीमध्ये जुन मध्ये वादळसदृश परिस्थिती असते वादळ आलं झाडं फांद्यासह कोसळतात त्याच पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात राज्यात मोठे राजकीय वादळ येणार असून, मुख्यमंत्री हे फांदीवर असून,खोडावर नाहीत.त्यामुळं हे सरकार जून मध्ये पडणार असल्याची भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे.

वाशिममध्ये नारायण राणेंची (Narayan Rane) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे (Narayan Rane) यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींच्या भोग्यांच्या मुद्दयांवरून आक्रमक झाले आहेत. या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेचे नारायण राणे (Narayan Rane) यांनी कौतूक केले. तसेच प्रत्येकाने परवानगीने भोंगे लावावे, असेही त्यांनी म्हटले.

भोंग्यावरून राज ठाकरे यांना धमकी येत आहे त्यावर नारायण राणे म्हणाले की, शिवसेना आता वाघ राहला नसून ते आता मेंढ्या झाली असल्याची खऱमरीत टीका केली. त्यांच्यामध्ये धमकी देण्याची ताकदच उरली नसल्याचेही त्यांनी म्हटले.

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील बंगल्यावर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईवर बोलताना राणे म्हणाले, माझ्या घरावरील कारवाई ही सूड बुद्धीने करण्यात येत आहे. दरम्यान माझ्या खात्या मार्फत जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून आत्मनिर्भर भारतासाठी 30 योजनांची वाशिम सारख्या आकांक्षीत जिल्ह्यात अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा