थोडक्यात
आज मविआ आणि मनसेची बैठक
बैठकीला राज ठाकरेही राहणार उपस्थित
वाय. बी. सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन
(Raj Thackeray) बैठकांच सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आणि आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर बैठकांचा जोर असून याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरच्या ‘मोर्चे’बांधणीसाठी आज मनसे आणि मविआची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षांचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईत 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.
बैठकीत मोर्चाच्या तयारीचाही आढावा घेण्यात येणार असून बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.