महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट

Published by : Lokshahi News

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असताना देखील चोरी-छुप्प्याने बार चालवला जात होता. हा बार अनधिकृत असल्याने पोलिसांकडून पालिकेला तोडक कारवाई पत्र दिले होते. त्यानुसार आज या बारवर बुलडोझर फिरवण्यात आला.

काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसी बार हा राञी चोरी छुपे सुरु ठेवत होता. या बारमध्ये मुली लपवण्यासाठी तयखाना ही तयार करण्यात आला होता. दरम्यान हा बार अनधिकृत होता. त्यामुळे या बारवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांकडून पालिकेला देण्यात आले होते. त्यावर आज मिरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत पथकासह मानसी लेडीज बार भुईसपाट करुन टाकलं.

दरम्यान गेल्या आठवड्यात काशिमीरा पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास मानसी लेडीज बार मध्ये धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 7 मुलींसह 2 तृतीयपंथीयांचे सुटका करण्यात आली. तर ग्राहक आणि स्टाफसहित 19 आरोपींना अटक ही करण्यात आलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम कोर्टाचा निर्णय

Nariyali Bhat (Sweet Coconut Rice) : आता बनवा नारळी पौर्णिमा स्पेशल 'नारळीभात'

Tuljabhavani Temple : आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; 'या' तारखेपर्यंत राहणार बंद

Health Tips : आरोग्यामध्ये शास्त्राचे महत्त्व काय?, जाणून घ्या..